दोन मेडिकल ऑफीसरसह पिंपळनेर पोलीस घटनास्थळी
लिंगनिदानचे खरे म्होरके मोकाट, प्रशासनाकडून
अभय का?
बाहेर जिल्ह्यातून लिंगनिदानची घरपोच सेवा कोण देतं?
शोध घ्या
बीड (रिपोर्टर) गर्भपातादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या शीतल गाडे मृत्यू प्रकरण जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेत दोषींची शोधाशोध सुरू केली असून पाच जणांविरोधात पिंपळनेर पोलिसात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दोन वैद्यकीय अधिकार्यांच्या समितीचे पथक पुन्हा बक्करवाडी येथे गेलेले असून या प्रकरणातले जास्तीत जास्त हस्तक शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यात आरोपींची संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे.
सिताबाई ऊर्फ शीतल गणेश गाडे या 30 वर्षीय महिलेचा अवैधरित्या गर्भपात करताना मृत्यू झाला. या घटनेने बीड जिल्ह्यात लिंगनिदान आणि स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याचे उघड झाले. बीडसह जिल्ह्यातील अनेक डॉक्टर या पापामध्ये सहभागी आहेत. सदरचे प्रकरण उघड झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात प्रचंड हालचाली सुरू करत गेवराई तालुक्यातील रानमळा येथून अंगणवाडी सेविका त्याचबरोबर सिस्टर यांना ताब्यात घेतले होते. आज पहाटे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ढाकणे यांच्या फिर्यादीवरून मयत महिलेचा पती गणेश गाडे, सासरा सुंदरराव गाडे, भाऊ नारायण निंबाळकर, मध्यस्थ महिला अंगणवाडी सेविका मनिषा सानप, सीमा सिस्टर यांच्यावर भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांसह पीसीपीएनडीटी आणि एमटीपी कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल असून या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके हे करत आहेत. आज दोन वैद्यकीय अधिकार्यांची टीम ही बक्करवाडीला जाणार असून या प्रकरणातले एक ना एक धागे जुळवण्याचे काम यंत्रनेकडून केले जात आहे.
सीमा सिस्टरचा बिंदुसरेत मृतदेह आढळला
या प्रकरणातील सीमा सुरेश डोंगरे (वय 45, रा. शिक्षक कॉलनी, बीड) या सिस्टरचा आज सकाळी बिंदुसरा धरणात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे .या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतला. या सिस्
लिंग निदानासाठी जिल्हा बाहेरूनही येते गाडी
लिंग निदान करण्यासाठी जिल्हाबाहेरील काही डॉक्टर बीड जिल्ह्यात येतात. लिंग निदानाची घरपोच सेवा दिली जात असल्याचेही बोलले जाते. एवढेच नव्हे तर आडकाठी गावच्या रस्त्यावर गाडी उभा करून लिंगनिदान केले जात असल्याचेही आता बोलले जात आहे. या प्रकरणाचा शोधही पोलिसांनी लावायला हवा.
सगळं खरं, लिंगनिदान कुठं केलं?
ते डॉक्टर का सापडेनात?
या प्रकरणात लिंग निदान ज्या दवाखान्यामध्ये झालं आहे, ज्या महिला डॉक्टरने लिंग निदान केले आहे, त्या डॉक्टरचा शोध यंत्रणेला लागत नाही की त्याकडे दुर्लक्ष केलं जातय? खरंतर सर्वात अगोदर लिंगनिदान करणारे महापापी पोलीसांच्या जाळ्यात असायला हवेत. अद्याप लिंगनिदान करणारे दोषी मोकाट असल्याची चर्चा होत आहे. या प्रकरणात जर दोषी नसतील तर अन्य प्रकरणात असे दोषी सापडून प्रशासनाने त्यांच्या मुसक्या आवळाव्यात.