बीड (रिपोर्टर) बीड शहरातील नगर रोडवरील हॉटेल क्लासिक येथे तीन टेबलवर हारजीतचा जुगार सुरू असल्याची माहिती थेट पंकज कुमावतांना मिळाली. त्यांनी आपले पथक पाठवून त्याठिकाणी धाड टाकली असता हारजीतचा जुगार खेळताना 20 जुगारी रंगेहात मिळून आले. त्यांच्याकडे रोख 1 लाख 13 हजार 450 रुपये तर मोबाईल असा एकूण 1 लाख 81 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 20 जुगार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांना बीड शहरातील हॉटेल क्लासिक येथे हारजीतचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी काल रात्री पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पाटील व केज पोलीस ठाण्याचे अमलदार यांना त्याठिकाणी पाठविले. पोलिसांनी हॉटेल क्लासिकवर धाड टाकली असता दुसर्या मजल्यावर तीन टेबल सुरू होते. या वेळी पोलिसांनी जुगार खेळणार्या 20 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रोख 1 लाख 13 हजार 450 रुपये तर मोबाईल असा एकूण 1 लाख 81 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणी मालक प्रवीण राजेंद्र पालवणकर यांच्यासह एकूण 20 जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सचीन पांडकर, सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेश पाटील, पो.हे.कॉ. बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, बालाजी दराडे, सचीन अहंकारे, दिलीप गित्ते, महादेव बहिरवाल, संजय टुले, दिलीप जावळे यांनी केली.