Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनालॉकडाऊनमध्ये नियमाचं उल्लघन केलं कापड दुकानदारास २५ हजाराचा दंड

लॉकडाऊनमध्ये नियमाचं उल्लघन केलं कापड दुकानदारास २५ हजाराचा दंड


बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन असतांना काही व्यापारी लपून छपून दुकान उघडतात. आज सकाळी शाहू नगर भागातील एका कपडाच्या दुकानदाराने नियमाचं उल्लघन केल्याचे समोर आल्यानंतर सदरील दुकानदारास शिवाजी नगर पोलीसांनी नगर पालिकेच्यावतीने २५ हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनच्या कार्यकाळात नियमाचं उल्लघन करत असल्याचे समोर येत आहे. नियम न पाळणार्‍यांना नगर पालीका दंड आकारत आहे. शाहू नगर येथील संत शिरोमणी टेक्सटाईल्स या दुकानदारांने नियम डावलून दुकान उघडले होते. हा प्रकार शिवाजी नगर पोलीसांनी व न.प. कर्मचार्‍याच्या निर्दशनास आल्यानंतर या दुकानदाराला २५ हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे, पोलीस नाईक घोडके, पोलीस नाईक उजगरे, पोलीस नाईक चव्हाण, पोलीस कॉ. शेख व न.प.कर्मचारी यांनी केली.
केजच्या पाच दुकानदारांना दंड
केज शहरातील बाजार समिती परिसरात पाच दुकाने सुरू असल्याची माहिती नगरपंचायत आणि तहसीलदार यांना झाल्यानंतर त्याठिकाणी जावून संबंधित दुकानदारावर कारवाई करत त्यांच्याकडून १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई केजचे प्रभारी तहसीलदार धस, नगरपंचायतचे कर्मचारी खतिब, सय्यद अतिक, शेख आजाद यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!