Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यात आज ६०३ बाधीत बीड तालुका सर्वाधिक तर परळी सर्वात कमी

जिल्ह्यात आज ६०३ बाधीत बीड तालुका सर्वाधिक तर परळी सर्वात कमी


बीड- मे महिन्यात मृत्युचे तांडव करणारा कोरोना शेवटच्या आठवड्यात अल्पसा कमी होताना दिसून येत आहे. रोज ७०० च्या आसपास बाधीत मिळून येत असताना आज मात्र ५ हजार ५८८ संशयितांच्या तपासण्या केल्यानंतर ६०३ बाधित आढळून आले आहेत.
बीड जिल्ह्यात ५ हजार ५८८ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले असता आज दुपारी त्याचा अहवाल प्राप्त झाला असून ४ हजार ९८५ जण निगेटिव्ह आले आहे तर ६०३ कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये अंबाजोगाई ५५, आष्टी ७१, बीड १६५, धारूर ३०, गेवराई ५८, केज ६५, माजलगाव ५०, परळी १२, पाटोदा २६, शिरूर ४९ तर वडवणी तालुक्यात १४ रुग्ण आढळून आले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!