Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमप्रेयसीवर अॅसीड टाकूण जाळणाऱ्या आरोपीच्या बीड,देगलुर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रेयसीवर अॅसीड टाकूण जाळणाऱ्या आरोपीच्या बीड,देगलुर पोलिसांनी आवळल्या मुसक्या


बीड (रिपोर्टर)
पोलीस स्टेशन नेकनुर हद्दीत येळंबघाट शिवारात ढाणे मंगल कार्यालयाचे जवळील खदानीत एका महिलेला अॅसीड व पेट्रोल टाकुण जाळलेल्या घटने संदर्भात पोलीस स्टेशन नेकनुर येथे दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस देगलुर पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेतले.
दिनांक 14 नोव्हेंबर 2020 रोजी पोलीस स्टेशन नेकनुर ता. बीड हद्दीत येळंबघाट शिवारात ढाणे मंगल कार्यालया जवळील खदानिमध्ये एक 22 वर्षीय महिला अर्धवट जळालेल्या स्थितीत पडलेली आहे अशी माहिती पोलीस स्टेशन नेकनुर येथे मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक केंद्रे व सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन पाहणी केली असता सदर ठिकाणी एक महिला अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळुन आली . पोलीस पथकाने नमुद महिलेस तात्काळ उपचार कामी सरकारी वाहनामध्ये टाकुण प्रथम सरकारी दवाखाना नेकनुर येथे आणले व प्रथमोपचार करुण पुढील उपचार कामी सरकारी दवाखाना बीड येथे शरिक केले . त्यानंतर सदर जखमी महिलेकडे विचारपुस केली असता नमुद महिलेने तिचे नाव सावित्रा दिगंबर अंकुलवार , वय 22 वर्षे , व्यवसाय घरकाम रा . शेळगांव ता . देगलुर जि . नांदेड असे असुन ती तिचे मर्जीने मागील दोन वर्षापासुन घरी कोणालाही काहिही न सांगता ती तिच्या गावातील अविनाश रामकिसन राजुरे , वय 25 वर्षे , रा . शेळगाव , ता . देगलुर , जि . नांदेड याच्यासोबत शिरुर जि . पुणे येथे राहत होती . दिनांक 13/11/2020 रोजी दुपारी 12.00 वा सुमारास सावित्रा हिचा प्रियकर अविनाश राजुरे हा तीला फिरण्यास जावु असे म्हणुन तिला सोबत घेवुन मोटार सायकलवर निघाले होते . त्यानंतर ते दोघे रात्री 09.00 वा सुमारास मांजरसुंबा ते केज जाणारे रोडवर येळंबघाट येथील ढाणे मंगल कार्यालया शेजारी असणाऱ्या खदानी जवळील शेतात झोपले होते . दिनांक 14/11/2020 रोजी पहाटे 03.00 वा सुमारास अविनाश राजुरे याने सावित्रा हिचा अचानक तिचा गळा दाबला व तोंडावर , छातीवर , हातावर पेट्रोल व अॅसीड टाकुण तिला पेटवुन दिले व तो सदर ठिकाणावरुन पळुन गेला अशी हकीगत सांगीतल्याने नमुद महिलेचा जबाब नोंद करुन पोलीस स्टेशन नेकनुर येथे गु.र.नं. 257/2020 , कलम 307 , 326 ( अ ) भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव हे करत आहेत . उपचारा दरम्यान नमुद महिलेचा दिनांक 14/11/2020 रोजी रात्री 10.55 वा मृत्यु झाला असुन नमुद गुन्ह्यामध्ये कलम 302 भादवी ची वाढ करण्यात आली आहे . नमुद गुन्ह्यामधील आरोपी अविनाश रामकिसन राजुरे , वय 25 वर्षे याचा शोध घेणे कामी दोन तपास पथके रवाना केले होते . पोलीस स्टेशन नेकनुर यांनी पोलीस स्टेशन देगलुर , जि . नांदेड यांच्याशी समन्वय साधला असता नमुद आरोपीस देगलुर पोलीसांनी देगलुर , जि . नांदेड येथुन ताब्यात घेतले आहे . नमुद आरोपीस नेकनुर पोलीस स्टेशनचे तपास पथक ताब्यात घेवुन पुढील कारवाई करत आहेत .

तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करुन नंतर तिला जिवंत जाळण्याच्या बीडमधील घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे. दोषींना कोणत्याही स्थितीत कडक शिक्षा व्हावी यासाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्टा’त खटला चालवण्यासंदर्भात सूचना केली आहे. या प्रकरणी मी स्वतः लक्ष ठेवून आहे.

– अनिल देशमुख, गृह मंत्री

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!