Monday, June 14, 2021
No menu items!
Homeक्राईमआ. पवारांनी नदी पात्रात स्पॉट पंचनामे करताच महसूल विभाग जागे झाले चोरटे...

आ. पवारांनी नदी पात्रात स्पॉट पंचनामे करताच महसूल विभाग जागे झाले चोरटे मार्ग बंद करण्यासाठी रस्ते खोदले


गेवराई (रिपोर्टर):- राज्य शासनाच्या वतीने गेवराई तालुक्यात प्रायोगिक तत्वावर हायवाने वाळु वाहतूक बंद करण्याचे आदेश आल्यानंतर याबाबतची अंमलबजावणी करा यासाठी आ. लक्ष्मण पवारांनी आक्रमक पवित्रा घेत काल तहसीलदार, महसूल प्रशासनाच्या अधिकार्‍यांना सोबत घेत गोदापात्रात जावून स्पॉट पंचनामे केले. यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. चोरट्या मार्गाने ज्या रस्त्यातून वाळुच्या गाडया जातात ते सर्व मार्ग आज जेसीबीने खोदून बंद केले जात आहेत.
गोदावरी नदीच्या पात्रातून ट्रॅक्टरद्वारे वाळुची वाहतूक करावी, अशी मागणी आ. लक्ष्मण पवार यांनी केल्यानंतर तसे आदेश महसूल विभागाला देण्यात आले. मात्र असते असतानाही हायवाद्वारे वाळुची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येत होते. काल लक्ष्मण पवार यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेत नदीपत्रात जावून स्पॉट पंचनामे केले व संबंधित विभागाला कारवाई करण्याचे निर्देश दिले. लक्ष्मण पवारांच्या आक्रमकतेमुळे महसूल प्रशासन चांगलेच खडबडून जागे झाले. महसूल विभागाने कारवाई करायला सुरुवात केली. सकाळपासून खामगाव, संगमजळगाव, राजापूर, काठोडा, राक्षसभुवन, सुरळेगाव, पांचाळेश्वर, म्हाळसपिंपळगाव, हिंगणगाव यासह गोदाकाठचे सर्व वाळू रस्ते खोदून काढणे सुरू आहे. माफियागिरी रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस मोहीम हाती घेतली आहे.

रस्ते देणार्‍या शेतकर्‍यांच्या सातबारावर बोजा टाकला जाणार
वाळुची चोरटी वाहतूक करण्यासाठी काही वाळु माफियांनी शेतकर्‍यांच्या शेतातून रस्ते काढले होते. त्या बदल्यात शेतकर्‍यांना वाळु माफिया पैसे देत होते. याबाबत तहसीलदारांनी ठोस भूमिका घेत जे शेतकरी वाळु माफियांना आपल्या शेतातून रस्ते देतील त्या शेतकर्‍यांच्या सातबारावर बोजा टाडकण्याचा निर्णय तहसीलदार खाडे यांनी घेतला आहे.

Most Popular

error: Content is protected !!