Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईपदोन्नती आरक्षण रद्द : राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक ठरणार वादळी?

पदोन्नती आरक्षण रद्द : राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक ठरणार वादळी?


मुंबई (रिपोर्टर):- पदोन्नती आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये मतभेद झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आज होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक चांगलीच गाजणार असल्याची शक्यता आहे. कारण, कॉंग्रेस नेते व ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आजच्या बैठकीत कॉंग्रेसकडून या मुद्यावर आक्रमक भूमिका घेतली जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.


आरक्षणातील पदोन्नतीच्या विषयावरून शिवसेना व राष्ट्रवादी संयमी भूमिका घेत असताना कॉंग्रेसमधील नेत्यांचा एक गट आक्रमक झाला आहे. त्यावरून वाद सुरू आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्याचे पडसाद पडण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
आज राज्यमंत्री मंडळाची बैठक आहे. तत्पूर्वी आमची पक्षाची बैठक होईल, या बैठकीत जे काही निर्णय होतील, त्यानुसार राज्य मंत्रिमंडळात हा विषय आणला जाईल. आमचा प्रयत्न राहणार आहे की, मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्या अगोदर या विषयावर चर्चा झाली पाहिजे आणि ७ मे चा अध्यादेश रद्द झाला पाहिजे, ही भूमिका आमच्या पक्षाने घेतलेली आहे. कॅबिनटेची बैठक होऊ द्या मग तुम्हाला कळेल डॉ. नितीन राऊत काय करतात? असं नितीन राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे. दरम्यान, पदोन्नती आरक्षणाच्या मुद्यारून नितीन राऊत यांनी जाहीर वक्तव्य करणं योग्य नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयात कॉंग्रेसचे मंत्री सहभागी आहेत, तर तीन पक्षांचं सरकार असताना जाहीर वक्तव्य करण्यापेक्षा समन्वय समिती समोर भूमिका मांडावी असा सल्ला देखील नवाब मलिक यांनी दिला आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!