Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईसंभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट

संभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट


मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे, अजित पवारांना एकत्र आणण्याची केली विनंती
मुंबई (रिपोर्टर): मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे महाराष्ट्र दौर्‍यावर असून आरक्षणप्रश्नी आज त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात त्यांनी पवारांकडे एक विनंती केली आहे.


संभाजीराजे यांनी आज सकाळी पवारांच्या निवासस्थानी सिल्वर ओक येथे त्यांची भेट घेतली. संभाजीराजे व पवारांमध्ये १५ मिनिटं चर्चा झाली. या नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संभाजीराजे यांनी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. तसंच, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे, अजित पवार या सर्व नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, अशी विनंती संभाजीराजेंनी पवारांना केली आहे.
’तीन-चार दिवस मी महाराष्ट्राचा दौरा केला. मराठा समाज किती अस्वस्थ, दुःखी आहे हे मी शरद पवारांना सांगितलं. मराठा समाजावर अन्याय होत आहे. मी सर्व परिस्थिती त्यांच्या कानावर घातली आहे. सर्व नेत्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे. तसंच, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, नारायण राणे, अजित पवार अशा सर्वांनाच एकत्र आणण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती मी त्यांना केली,’ असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!