Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनागृहविलगीकरण बंद केल्याने लोक स्वत:हून टेस्ट करेनात, लोका हो, घाबरू नका, लक्षणे...

गृहविलगीकरण बंद केल्याने लोक स्वत:हून टेस्ट करेनात, लोका हो, घाबरू नका, लक्षणे दिसले की टेस्ट करा


बीड (रिपोर्टर):- राज्य शासनाने कोरोना बाधितांना गृह विलगीकरणात राहण्यास बंद केल्यानंतर बीड जिल्ह्यात लक्षणं असलेल्या नागरिकांनी स्वत:हून कोरोना टेस्ट करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गृहविलगीकरण बंद केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हा टेस्टपासून बचाव करू पाहत असल्याचे समोर येत असल्याने कोरोना समुहसंसर्गाचा धोका अधिक बळावला आहे. त्यामुळे लोका हो, कोरोनाचे लक्षण दिसले की तात्काळ जवळच्या रुग्णालयात जावून कोरोना तपासरी करून घ्या, अद्याप बीड जिल्हा रेड झोनमध्ये असून दिवसागणिक सहाशेकपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाला हद्दपार करायचे असेल तर जनतेने स्वत:हून आरोग्य प्रशासनासह जिल्हा प्रशासनाला मदत करावी.


बीड जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. राज्यातल्या अठरा जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण बंद केले असून त्यामध्ये बीडचाही समावेश आहे. राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, गृहविलगीकरणात राहिलेल्या व्यक्तीकडून त्याचा प्रसार होऊ नये, कोरोना आटोक्यात यावा या उदात्त हेतुतून गृहविलगीकरण बंद करण्याचा निर्णय गेल्या पाच दिवसांपूर्वी घेतला. शासनाचा हा निर्णय आल्यापासून बीड जिल्ह्यात कोरोनाचे लक्षणे असलेले लोक स्वत:हून रुग्णालयामध्ये कोरोना टेस्ट करून घेत नसल्याचे समोर येत आहे. गृह विलगीकरण बंद केल्यामुळे आपण जर टेस्ट केली आणि त्यामध्ये पॉझिटिव्ह आढळून आलोत तर आपल्याला चौदा दिवस रुग्णालयात अथवा कोविड सेंटरमध्ये राहावे लागेल. या भीतीपोटी जिल्ह्यातील बरेच लक्षणे असलेले लोक आता स्वत:हून कोरोना तपासणी करून घेत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे लोका हो, कोरोनाला समुळ हद्दपार करावयाचे असल्याने गृह विलगीकरण बंद असले तरी कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येते.
भिऊ नका, स्वत:हून तपासणी करा
गृहविलगीकरण बंद केल्यामुळे अनेक लक्षणे असलेले नागरिक केवळ आपण पॉझिटिव्ह आलोत तर चौदा दिवस कोविड सेंटरमध्ये राहावे लागेल या भितीपोटी खोकला, सर्दी, धाप लागणे, अशी लक्षणे दिसून आल्यानंतरही कोरोना चाचणी करून घेत नाहीत. आता जिल्हा रुग्णालयासह कोविड सेंटरमध्ये साधे आणि ऑक्सीजन बेड शिल्लक आहेत. त्यामुळे लोकांनी निर्भय होऊन तपासणी करत कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासन-प्रशासनाला सहकार्य करावे.


कोरोना हळूहळू
कमी होतोय

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या बीड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसून येत आहे. ही समाधानाची बाब असली तरी अद्यापपयर्ंत सहाशेच्या आसपास रोज कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. ही संख्या कोरोनाचा समुह संसर्ग वाढवण्यासाठी आजही तेवढीच धोकादायक आहे. त्यामुळे कोरोनाला समुळ हद्दपार करण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे.

Most Popular

error: Content is protected !!