Monday, June 14, 2021
No menu items!
Homeकोरोनाआजच्या अहवालात 700 पॉझिटिव्ह बीड तालुक्यातला आकडा कमी होईना

आजच्या अहवालात 700 पॉझिटिव्ह बीड तालुक्यातला आकडा कमी होईना

बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होत असली तरी बीड शहरासह तालुक्यातील आकडा कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. आज आलेल्या रिपोर्टमध्ये 700 पॉझिटिव्ह आढळून आले. 5 हजार 969 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. 6 हजार 669 संशयितांची चाचणी करण्यात आली.

अंबाजोगाई 39, आष्टी 56, बीड 251, धारूर 21, गेवराई 83, केज 64, माजलगाव 46, परळी 14, पाटोदा 48, शिरूर 55 आणि वडवणीमध्ये 23 रुग्ण आढळून आले आहेत. सगळ्यात कमी रुग्णांचा आकडा परळी तालुक्यातील असून बीड शहरासह तालुक्याचा आकडा कमी होत नसल्याचे दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!