दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी सह विनयभंगाचा गुन्हा दाखल
दिंद्रुड (रिपोर्टर):-दिंद्रुड पासून जवळच असलेल्या एका शासकीय माध्यमिक आश्रम शाळेतील निवासी महिला अधीक्षिकेचा बळजबरीने हात धरून फोटो काढल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकवर अट्रोसिटी ऍक्ट सह विनयभंगाचा गुन्हा दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,दिंद्रुडपासून जवळच असलेल्या एका निवासी आश्रम शाळेत निवासी महिला अधिशिका म्हणून काम करणार्या महिलेला ऑफिस मध्ये बोलवून तुम्ही अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या कशाला करता असे म्हणून तुम्ही 8 दिवस सक्तीच्या रजेवर जा म्हणत जबरदस्ती हात धरून सक्तीच्या रजेचा आदेश माझ्या हाती देऊन मोबाईलमध्ये बळजबरीने फोटो काढला अशा आशयाची तक्रार दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये दिल्यामुळे संबंधित मुख्याध्यापकावर कलम 354,506, अट्रोसिटी ऍक्ट कलम 3(1) (डब्ल्यु)(1)(2),कलम 3(2)र्(ींर)प्रमाणे गुन्हे दाखल झाले असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक धिरज कुमार बच्चू करत आहेत.