अक्षय विधाते । आष्टी
तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून विजेच्या कडकडाटात वादळी वार्यासह अवकाळी पाऊसाने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले शेतकर्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे.मातकुळी येथील बापू जरे या शेतकर्यांचे संत्रा पिकाचे 15 लाख रुपये नुकसान झाले कारखेल येथील राहत्या घरावर विज पडून घराचे नुकसान झाले तालुक्यातील अनेक गावातील शेतकर्यांचे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके फळबागा जमीनदोस्त झाली आहेत.अनेक ठिकाणी वृक्ष फळबागा उन्मळून पडली गहु,ज्वारी, हरभरा, काढणीला आलेल्या पिकांचे ही नुकसान झाले.शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई घ्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
नेहमीच शेतकर्यांना कुठल्या ना कुठल्या संकटांचा सामना करावा लागत आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी शेतकर्यांची चिंता वाढली आहे. पिके चांगली बहरात असताना काढणीला आलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. उसनवारी कर्जबाजारी होऊन केलेली पेरणी. मुलाबाळांप्रमाणे जोपासलेलं पिक निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावले जात आहे.तालुक्यात विविध भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली. तर काढणीला आलेल्या पिकांचेही नुकसान झाले.मातकुळी येथील बापू जरे या शेतकर्यांचे 4 एकर संत्रा हा खाली सडीघाण झाला आहे.5 एकर लिंबाचे देखील नुकसान झाले आहे.लिंबुनीचे 10 झाडे उन्मळून पडली आहेत.संत्राचे 15 लाख रुपये अपेक्षित उत्पन्न होते.सर्व्फळ खाली पडल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, तलाठी राजकुमार आचार्य, ग्रामसेवक बारीकराव पठाडे,कृषी सहायक शोभा वामन, सरपंच बबन डोके आदी च्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.सोमवारी दि.6 मार्च ला रात्री व मंगळवारी दि.7 मार्च रोजी दुपारी 12 च्या दरम्यान ढगांच्या कडकडाटात वादळीवार्यासह पाऊस झाला यामध्ये देवळाली येथील हरिभाऊ तांदळे यांच्या केशर आंबा,संत्रा , चिंचोली येथे सतिश एकशिंगे यांच्या संत्रा पिकाचे नुकसान झाले, तालुक्यातील अनेक भागातील परिसरातील शेतकर्यांच्या शेतातील गहू, हरभरा, ज्वारी ही पिके जमीनदोस्त झालीत. झाडांची संत्री जमीनीवर पडली आहेत. यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. वादळी वार्याने गहू भूसपाट झाला आहे. संत्रा गळून पडला आहे. झाडाखाली संत्र्याचा सडा पाहायला मिळतो. खाली पडल्यामुळे असा संत्रा लवकर खराब होतो. या नुकसानीमुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे.शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकर्यांना आर्थिक मदत देऊन आधार देणे आवश्यक आहे.