Home कोरोना जिल्ह्यातील चेकपोस्ट बनतात वसुली नाका शंभर-दोनशेची पावती फाडा आणि मोकाट फिरा

जिल्ह्यातील चेकपोस्ट बनतात वसुली नाका शंभर-दोनशेची पावती फाडा आणि मोकाट फिरा


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील कोरोनाचा समुहसंसर्ग आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी कडक लॉकडाऊन घोषीत केला आहे. जे लोक विनाकारण रस्त्यावर येतील त्यांना घरात पाठवण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि जागोजागी चेकपोस्ट उभाले आहेत. मात्र पोलिसांनी यामध्ये केवळ वसुली सुरू केली असून बाहेर निघल्यावर शंभर, दोनशे ते हजाराची पावती फाडून कुठेही जाण्यास परवानगी दिली जाते. वास्तविक पाहता पावती न देता त्यांना वापस पाठवणे गरजेचे आहे मात्र अशा कुठल्याच चेकपोस्टवर होताना दिसून येत नाही. त्यामुळे पावती फाडल्यावर कोरोना होत नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.


जिल्ह्यातील वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जगताप यांनी कडक लॉकडाऊनचे आदेश दिलेले आहेत. ते स्वत: रस्त्यावर उतरून घरात बसण्याचे आवाहन करत आहेत. मात्र काही सडकफिरे विनाकारण रस्त्यावर फिरतात. अशा सडकफिर्‍यांना रोखण्यासाठी पोलिसांचा जागोजागी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला असून जिल्ह्यासह तालुक्याच्या सिमेवर चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. मात्र या चेकपोस्टवर पावती फाडून नागरिक कुठेही जावू शकतात. त्यांना पोलीस अडवतात आणि पलिकड जायचे असल्यास पावती फाडायला सांगतात. हे चेकपोस्ट वसुलीसाठीच उभारलेत की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कारण पावती फाडल्यावर कोरोना होत नाही का? असाही प्रश्‍न विचारला जात आहे. पोलीसकोणालाच वापस न पाठवता पावती फाडून सोडून देत असल्याने कोरोना आटोक्यात येण्यास अडथळा निर्माण होत आहे. याकडे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.
error: Content is protected !!
Exit mobile version