Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाशिरूरच्या कोविड सेंटरचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले कौतुक

शिरूरच्या कोविड सेंटरचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले कौतुक


शिरूर (रिपोर्टर):- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब यांनी शिरूर येथे पद्मविभूषण शरद पवार यांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केले आहे. या कोविड सेंटरची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दखल घेत महेबूब यांच्या कामाचे कौतुक केले आहे. गोरगरिबांना या कोविड सेंटरचा आधार मिळाला असून हे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गा पाटील यांनी काढले आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शिरूर कासार येथे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शेख महेबूब यांनी पद्मविभूषण शरद पवार या नावाने कोविड सेंटर सुरू केले. या कोविड सेंटरची दखल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेऊन महेबूब यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. गोरगरिब, हातावर पोट असलेली मंडळी, परप्रांतिय मजूर अथवा एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या या सर्वांसाठी आपण व आपले सहकारी जे कार्य करत आहात ते कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जयंत पाटील यांनी काढले आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कामाची दखल घेत जे कौतुक केले आहे त्यामुळे आपल्याला नक्कीच बळ मिळणार असल्याचे महेबूब यांनी म्हटले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!