Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनानेकनूर पोलीसांकडून सडकफिर्‍यांविरोधात कारवाई

नेकनूर पोलीसांकडून सडकफिर्‍यांविरोधात कारवाई

५६ जणांची केली दुपारपर्यंत अँटीजेन टेस्ट
नेकनूर (रिपोर्टर):- लॉकडाऊनमध्ये अनेक सडकफिरे विनाकारण रस्त्याने फिरत असतात. अशा सडकफिर्‍यांविरोधात नेकनूर पोलीसांनी कारवाईला सुरुवात केली. दुपारपर्यंत ५६ जणांना ताब्यात घेतले. त्यांची नेकनूर स्त्री रुग्णालयामध्ये अँटीजेन चाचणी करण्यात आली.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. असे असतानाही सडकफिरे रस्त्याने फिरतात. सडकफिर्‍यांविरोधात नेकनूर पोलीसांनी कारवाई करायला सुरुवात केली. दुपारपर्यंत ५६ जणांना ताब्यात घेऊन त्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. या वेळी सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी शरद कदम, अमोल नवले, खाडे, राख यांनी या कारवाया केल्या.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!