माजलगाव (रिपोर्टर) घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचा दरवाजा तोडून घरात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 83 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील टाकरवण येथील रामनगर वसाहत येथे घडली. या प्रकरणी आज सकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
विष्णू जयवंतराव खिल्लारे (रा. रामनगर वसाहत) या शेतकर्याने माजलगाव ग्रामीण पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते दि. 31-5-2022 ते 8-6-2022 दरम्यान गावाला गेले होते. 8 रोजी ते सकाळी अकरा वाजता गावी आले असता आपल्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.