Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनामाजी आ. अमरसिंह पंडित यांची वैद्यकीय अधिकार्‍यांसोबत बैठक

माजी आ. अमरसिंह पंडित यांची वैद्यकीय अधिकार्‍यांसोबत बैठक

कोरोनानंतर वेगळे आजार उद्भवल्यास
वेगळा कक्ष स्थापन करून उपचार

गेवराई (रिपोर्टर):- कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेक नागरिकांना वेगळे आजार उद्भवत आहेत. अशा रुग्णांसाठी वेगळा कक्ष स्थापन करून योग्य ते वेळेवर उपचार करण्याचे निर्देश माजी आ. अमरसिंह पंडित यांनी गेवराईच्या वैद्यकीय अधिकार्‍यांना दिले आहेत. या वेळी त्यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली.
कोरोनातून बरे झाल्यानंतर बहुतांश रुग्णांना वेगवेगळे आजार उद्भवत आहेत. यामध्ये म्युकर मायकोसिससारखा गंभीर आजार होत आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आ. अमरसिंह पंडित यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड पश्‍चात रुग्णांवर उपचार करण्यासाठी वेगळे कक्ष सुरू करून योग्य त्या उपचाराबाबत चर्चा केली. दरम्यान या पुढे गेवराई येथून कोरोनाच्या आजारातून बरे होऊन डिस्चार्ज करताना शारदा प्रतिष्ठाणकडून एक आरोग्य किट देण्याचा निर्णय अमरसिंह पंडित यांनी या वेळी जाहीर केला. या आरोग्य किटमध्ये टूथ ब्रश, साबण, आवश्यक औषधींचा समावेश असणार आहे. बैठकीला अधीक्षक डॉ. महादेव चिंचोळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, सुभाष निकम, दादासाहेब घोडके, संदीप मडके, अक्षय पवार, गोले यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!