Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमहिरालाल चौकातील सराफा दुकानाला लावली आग

हिरालाल चौकातील सराफा दुकानाला लावली आग

बीड (रिपोर्टर):- पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिरालाल चौकातील एका सराफा दुकानाला अज्ञात तिघांनी रात्री आग लावली असून या आगीमध्ये दुकानातील फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग लावणारे तिघे जण सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत सुरू होती.


हिरालाल चौकात सुहास गणेशराव बेदरे यांचे बेदरे ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. शनिवारी पहाटे तिनच्या दरम्यान अज्ञात तिघा जणांनी (पान ७ वर)
दुकानाला आग लावली. यामध्ये फर्निचरचे मोंठे नुकसान झाले आहे. आगीचा भडका झाल्याने नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. याची माहिती पेठ बीड पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्यासह पोलीसांनी धाव घेतली. अग्निशामक दलाने आग वेळीच विझवल्याने पुढील अनर्थ टळला.

Most Popular

error: Content is protected !!