Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeकोरोनावापरलेल्या पीपीई कीट रस्त्यावर फेकल्या

वापरलेल्या पीपीई कीट रस्त्यावर फेकल्या


बीड (रिपोर्टर):- एक वेडसर व्यक्ती कोरोना वार्डात वापरलेली पीपीई कीट घालून हिंडतांना दिसून आल्यानंतरही आरोग्य विभागाला त्याचे गांभीर्य लक्षात आले नाही. आज चक्क बार्शी रोडवरील सोमेश्‍वर मंदिर समोरील रोडवर वापरलेल्या पीपीई कीट, मास्क, हँडग्लोज टाकण्यात आले. ते दोन-तीन तास तसेच रस्त्यावर पडून होते. यामुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो. मात्र आरोग्य विभागाला याचे कसलेही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.


कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्याच्या नावाखाली जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकांना हेल्मेटच्या आतून मास्क घालण्याची सक्ती केली जाते. आरोग्य सेवेसाठी बाहेर पडलेल्या नागरीकांना दंड आकारला जातो. डॉक्टरांना ओळखपत्र दाखवूनही मारहाण केली जाते. मात्र रस्त्यावर सर्रासपणे वापरलेल्या पीपीई कीट फेकल्या जातात. याकडे जिल्हा प्रशासन कानाडोळा करत आहे. यामुळे संसर्ग वाढणार नाही का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. बार्शी रोडवरील सोमेश्‍वर मंदिर परिसरात पाच-सहा पीपीई कीट, हँडग्लोज, एका बॅगमध्ये भरून फेकण्यात आले. दोन-तीन तास ते रस्त्यावर पडून होते. तरी देखिल त्याची व्हिलेवाट लावण्यात आली नाही.

Most Popular

error: Content is protected !!