Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमगॅस लिकेज् होऊन घराला आग; सासु-सुनेसह मुलगी जखमी

गॅस लिकेज् होऊन घराला आग; सासु-सुनेसह मुलगी जखमी


घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक, नगदी रक्कमही जळाली; मंडल अधिकार्‍यांनी केला पंचनामा
सोनेसांगवी येथे घडली आज सकळी घटना

केज (रिपोर्टर):- गॅस लिकेज् झाल्याने घराला आग लागून सासू-सुनेसह एक मुलगी जखमी झाल्याची घटना आज सकाळी सोनेसांगवी येथे घडली. या आगीत घरातील इतर साहित्य जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


सोनेसांगवी येथील अशोक विष्णू कणसे यांच्या घरातील गॅस लिकेज् झाल्याने घरातील वस्तूंनी पेट घेतला. यामध्ये जयश्री अशोक कणसे (वय ३०), सुक्षणा विष्णू कणसे (वय ६०) आणि श्रध्दा अशोक कणसे (वय १४) हे तिघे जण जखमी झाले. या जखमींना उपचारार्थ अंबाजोगाईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीमुळे घरातील इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर अनेकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या आगीत कणसे यांच्या घरातील नगदी रक्कमही जळाल्याचे सांगण्यात आले. घटनेची माहिती महसुल विभागाला कळवण्यात आल्यानंतर तलाठी व मंडल अधिकार्‍यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

Most Popular

error: Content is protected !!