Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडअख्तर नगरमध्ये नालीचे पाणी नागरीकांच्या घरात

अख्तर नगरमध्ये नालीचे पाणी नागरीकांच्या घरात


नगरसेवक फक्त मतदानापुरतेच आहे का?

बीड (रिपोर्टर)ः- शहरातील वार्ड क्र. 18 मधील अख्तर नगर भागात रस्त्याची आणि नाल्याची दुरावस्था आहे. नाल्या नसल्याने दुषीत पाणी नागरीकांच्या घरामध्ये घुसत आहे. यामुळे या भागातील आरोग्य धोक्यात आले. निवडणुका आल्या की, स्थानीक पुढार्‍यांना लोकांची आठवण येते ऐरवी मात्र पुढारी लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. या वार्डातून जे नगर सेवक निवडुण आले त्यांना नालीचा प्रश्न दिसत नाही का? मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांनाही या प्रश्नाबाबत जाण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीड शहरातील अनेक वार्डात नागरी समस्या भेडसावत असतात. या समस्या सोडवण्यासाठी नगर पालिका सातत्याने दुर्लक्ष करत असते. वार्ड क्र.18 मधील अख्तर नगर भागात साध्या नाल्या असल्याने या नालीचे पाणी नागरीकांच्या घरात घुसत आहे. पक्या नाल्या या भागात अद्याप बांधण्यात आल्या नाहीत. रस्तेही व्यवस्थीत नाही. या परिसरात माणसं राहतात याचा विसर नगर पालिकेला पडला असवा. निवडणुकीत स्थानीक पुढारी समाज सेवेचा आव आणत असतात. आता या तथाकथीत समाजसेवकांना लोकांचे प्रश्न दिसत नाहीत का? या वार्डातून जे नगर सेवक निवडुणक आले त्यांना लोकांच्या प्रश्नाची जाण नाही का? त्या बरोबरच मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना लोकांचा प्रश्न देणं घेणं आहे की नाही? अशा संतप्त प्रतिकिया या भागातील नागरीकांतून व्यक्त होत आहे.

Most Popular

error: Content is protected !!