Saturday, December 5, 2020
No menu items!
Home बीड पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी महालक्ष्मी चरणी भाविकांची रीघ

पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी महालक्ष्मी चरणी भाविकांची रीघ

पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी महालक्ष्मी चरणी भाविकांची रीघ
बीडमध्येही आठ महिन्यानंतर आज मंदिर उघडले
बीड : रिपोर्टर
आठ महिन्यानंतर आज सकाळी महालक्ष्मी मंदिरात भक्तांना पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. पुन्हा एकदा भाविकांच्या गर्दीने कोल्हापूर फुलले असल्याचे चित्र दिसून आले. बिडमधीलही विविध मंदिर आज सकाळीच उघडले आहेत.
करवीर निवासिनी महालक्ष्मी व दख्खनचा राजा जोतिबा ही दोन प्रमुख मंदिरे शासन निर्णयानुसार आज सकाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी देवदर्शनाची ओढ लागल्याने सकाळपासूनच भाविकांची पावले मंदिराकडे वळली.
अल्पावधीतच भाविकांची गर्दी वाढत गेली. पहाटेच मंदिरातनिर्जंतुकीकरण,स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स या नियमावलीचे काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. दिवाळीच्या सुट्टीत हजारो भाविक येण्याची शक्यता असली तरी दररोज दोन ते तीन हजार भाविकांना दर्शनासाठी सोडले जाणार असून पाच फुटांचे सामाजिक अंतर ठेवले जाणार आहे असे सूत्रांनी सांगितले. याशिवाय देवस्थान समिती अंतर्गत ३०४२ मंदिरात सुद्धा भाविकांना दर्शनाची सोय केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

मोठी बातमी – मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी

औरंगाबाद : ऑनलाईन रिपोर्टर  मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग...

एकाच क्रमांाकाचे दोन ऍपे रिक्षे पोलीसांची चौकशी सुरू

बीड (रिपोर्टर)ः- शिवाजी नगर पोलीसांनी काही प्रवासी वाहतूक करणारे ऍपे रिक्षे ताब्यात घेतले आहे. यात दोन ऍपे रिक्षाचा नंबर एक सारखाच असल्याने...

सुप्रिया सुळेंना राज्याच्या नाही, केंद्राच्या राजकारणात रस -पवार

पुणे (रिपोर्टर)- भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय...

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...