Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाकोविड मुक्त झालेल्या रुग्णांनी आरोग्याची काळजी घ्यावी - आ. पवार

कोविड मुक्त झालेल्या रुग्णांनी आरोग्याची काळजी घ्यावी – आ. पवार


मोदी सरकारच्या सातव्या वर्षपूर्ती निमित्त गेवराई येथे भाजपच्या वतीने कोरोना मुक्त रुग्णांची तापसणी शिबिराचे आयोजन
गेवराई (रिपोर्टर) कोविड सारख्या महामारीची सामना करत असताना यातून बरे झालेल्या रुग्णांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे, मात्र जे लोक स्वत:ची काळजी घेतात, ते लोक गंभीर आजारात वाचलेत तसेच कोविड सारख्या रोगांतून बरे झालेले रुग्ण कुठल्याही गंभीर आजाराला तोंड देऊ शकतात त्यामुळे आता घाबरायची गरज नाही. फक्त इच्छाशक्ती भक्कम ठेवून आरोग्याची योग्य ती काळजी घ्या व काही त्रास झाल्यास तात्काळ तपासणी करून घ्यावी असे आवाहन आ.लक्ष्मण पवार यांनी केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या धर्तीवर गेवराई येथे भाजपच्या वतीने आ.लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे उदघाटन आ.लक्ष्मण पवार यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गेवराई तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ.एम.एच. चिंचोळे, डॉ.राजेश शिंदे, डॉ.जाजू, डॉ.कोटेचा, डॉ.राजेंद्र आंधळे, डॉ.सराफ, डॉ.अनिल दाभाडे, नगरसेवक जनमोहमद बागवान, ऍड.भगवान घुंबार्डे,डॉ.वैद्य यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!