बीड, (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात पुन्हा दुचाकीस्वारांनी डोके वर काढले असून वडवणी, सिरसाळा, परळी शहर येथुन प्रत्येकी एक तर केजमधून चार चाकी लंपास झाल्याची घटणा घडली असून याप्रकरणी त्या-त्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत.
पवन ज्ञानदेव अल्लाड रा. डोंगरगण ता.आष्टी यांनी आपली दुचाकी क्रं. एम.एच.12- डी.एच. – 8673 ही अण्णाभाऊ साठे चौक, आशिर्वाद बँक वडवणी येथे 6 मार्च रोजी उभी केली असता ती अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. वैजीनाथ देवीदास राठोड रा. सिरसाळा यांनी आपली चारचाकी स्विप्ट डिजायर क्रं. एम.एच. 15-डी.एस. – 9397, त्यांच्या राहत्या घरासमोर लावली असता ती काल रात्री अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. रत्नेश्वर ज्ञानदेव गायकवाड रा. परळी यांनी आपली दुचाकी क्रं. एम.एच. 44, आर-8595 ही आपल्या घरासमोर लावली असता ती परवा रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेली. हनुमंत भक्तराज सुरवसे रा. सोनार गल्ली मंगळवारपेठ केज या शेतकर्याने आपली दुचाकी क्रं. एम.एच.44, आर.4740 ही दुचाकी सोनार गल्ली येथे लावली असता ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली.