Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडअव्वलपूरच्या गावकर्‍यांनी श्रमदानातून केली रस्त्याला सुरूवात

अव्वलपूरच्या गावकर्‍यांनी श्रमदानातून केली रस्त्याला सुरूवात


पुढार्‍यांकडे मागणी करुन गावकरी थकले
बीड (रिपोर्टर)ः- अव्वलपूरच्या ग्रामस्थांना रस्ता नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात नागरीकांना चिखल तुडवत ये-जा करावी लागते. रस्त्याच्या मागणीसाठी अनेक वेळा पुढार्‍यांकडे मागणी केली. मात्र एकाही पुढार्‍याने मागणी पुर्ण केली नाही. शेवटी गावकर्‍यांनी पुढार्‍यांचा नाद सोडून देत श्रमदानातून रस्ता करण्यास सुरूवात केली. या श्रमदानासाठी गावातील तरुण मंडळी सरसावली होती.


बीड जिल्ह्यातल्या अनेक गावांना साधा कच्चा रस्ता नसल्याने त्या त्या गावातील लोकांना पावसाळ्याच्या दिवसात त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर चिखल होत असल्याने चिखल तुडवत गावकरी ये-जा करत असतात. बीड तालुक्यातील अव्वलपूरच्या गावकर्‍यांचा रस्त्याचा प्रश्न शासन, प्रशासनाने सोडवला नाही. रस्त्यासाठी अनेक वेळा पुढार्‍यांकडे चकरा मारल्या मात्र पुढार्‍यांना गावकर्‍यांची किव आली नाही. पुढारी रस्ता करत नसल्याचे पाहून गावातील लोकांनी एकत्रीत येत श्रमदानातून रस्ता करायला सुरूवात केली. या श्रमदानासाठी तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत होती.

Most Popular

error: Content is protected !!