आष्टी (रिपोर्टर):-अहमदनगर बीड महामार्गावरील चिचोंडी पाटील गावाजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस व दुचाकी च्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली हा अपघात ऐवढा भीषण होता की दुचाकी बस च्या पुढच्या चाकात अडकली सर्वत्र रक्त रक्तच सांडल्याचे दिसून आले.हरीओम दिगंबर घोडके वय 30 वर्ष असे मयताचे नाव आहे.
तालुक्यातील सुलेमान देवळा येथील ग्रामपंचायत सदस्य हरीओम दिगंबर घोडके हे चिचोंडी पाटील येथुन बुलेट दुचाकीवरून आपल्या गावी जात असताना अहमदनगर कडून येत असलेली उमरखेड अहमदनगर बस क्रमांक चक 40 ध 5923 व बुलेट मोटार सायकल (दुचाकी) यांचा अपघात होऊन, दुचाकीस्वार हरीओम दिगंबर घोडके वय 30 वर्ष राहणार सुलेमान देवळा तालुका आष्टी जिल्हा बीड या तरुणाचा मृत्यू झाला. सदरील घटनेने सुलेमान देवळा व परिसरात दुखःचे सावट पसरले आहे . शनिवार रोजी ग्रामस्थांनी आठवडी बाजार ही भरवला नसून सुलेमान देवळा गावावर शोककळा पसरली आहे.अपघात ग्रस्तांना स्थानिक ग्रामस्थांनी चिचोंडी पाटील गावचे सरपंच शरद भाऊ पवार यांना अपघाताची माहिती फोनवरून दिली. सरपंच व ग्रामस्थांनी खाजगी म्बुलन्स ने सदर युवकाला नगर येथील रुग्णालयात पाठवले. परंतु घोडके यांना जोराचा मार लागल्याने त्यांची प्राणज्योत मालवलीअपघात स्थळी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिर कुमार देशमुख व पोलीस कर्मचारी यांनी भेट दिली. पुढील तपास एपीआय शिशिर कुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.अहमदनगर येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून गावी दुपारी 1 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.