Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईमकेजमध्ये नात्याला काळीमा भावजाईवर बलात्कार

केजमध्ये नात्याला काळीमा भावजाईवर बलात्कार

केज (रिपोर्टर):- एका 25 वर्षीय विवाहितेवर चुलत दिराने अत्याचार केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.


केज तालुक्यातील एक 25 वर्षीय विवाहित महिला घरा सामोरील अंगणात झोपलेली असताना, चुलत दिर (वय 30 वर्षे) याने दीड महिन्यापूर्वी घराच्या बाजूला ओढत नेत तिच्यावर अत्याचार केला होता आणि तिला चाकूचा धाक दाखवून हा प्रकार कोणास सांगितला तर तुझी व्हिडिओ शूटिंग नातेवाईकांना दाखविण अशी धमकी दिली. त्यामुळे तेव्हा आपल्या इज्जती पोटी हा प्रकार पिडीतेने तीच्या पतीला सांगितला नाही. परंतु पुन्हा 28 मे रोजी रात्री अकरा वाजता परत पिडीतेवर चुलत दिराने अत्याचार केला. तिने हा प्रकार तीच्या पतीस सांगितला. तिच्या पतीने दिनांक 29 मे रोजी सकाळी सात वाजता याबाबत त्यास जाब विचारला असता त्याने त्यास शिवीगाळ केली आणि पोलीसात गेल्यास पतीची सुपारी देऊन जीव मारण्याची धमकी पिडीतेस दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडित विवाहितेने केज पोलीसात याबाबत तक्रार दाखल केल्याने आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यातआला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संतोष मिसळे हे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!