Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोना516 पॉझिटिव्ह बीड शहरात सडकफिर्‍यांमध्ये आढळले 5 पॉझिटिव्ह

516 पॉझिटिव्ह बीड शहरात सडकफिर्‍यांमध्ये आढळले 5 पॉझिटिव्ह


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यातील कोरोना हळूहळू कमी होवू लागला आहे. काल जिल्ह्यात 509 जण पॉझिटिव्ह आढळऊन आले होते. आज 4 हजार 200 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 516 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर बीड शहरात मोकार फिरणार्‍या 187 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली होती. त्यामध्ये 5 जण बाधित आढळून आले आहे.


गेल्या काही दिवसापासून कोरोना रूग्णांची संख्या हळू हळू कमी होत आहे. सोमवारी आलेल्या अहवालामध्ये 3 हजार 684 जण निगेटीव्ह आढळून आले. आजही पॉझिटिव्हमध्ये बीड तालुक्याचा आकडा सर्वाधिक असून तो तब्बल 218 आहे. अंबाजोगाई 18, आष्टी 57, धारूर 14, गेवराई 49, केज 22, माजलगाव 26, परळी 6, पाटोदा 58, शिरूर 26 आणि वडवणी तालुक्यात 22 रूग्ण आढळून आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!