Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाआज संध्याकाळी होणार जिल्ह्याच्या लॉकडाऊन शिथीलतेवर निर्णय जिल्हाधिकार्‍यांसह प्रशासनाची आयुक्त केंद्रेकरांसोबत व्हिसी...

आज संध्याकाळी होणार जिल्ह्याच्या लॉकडाऊन शिथीलतेवर निर्णय जिल्हाधिकार्‍यांसह प्रशासनाची आयुक्त केंद्रेकरांसोबत व्हिसी बैठक


जिल्ह्यात बाधितांची टक्केवारी दहा टक्क्यांच्यावर, काही अंशी शिथीलता मिळण्याची शक्यता
बीड (रिपोर्टर):- राज्यात ज्या जिल्ह्यात कोरोना बाधीतांची टक्केवारी 10 टक्क्यांच्या आत आहे त्या जिल्ह्यात उद्यापासून लॉकडाऊनमध्ये सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सुट मिळणार आहे. मात्र बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची टक्केवारी 10 टक्क्यांच्या वर असल्याने लॉकडाऊनमध्ये सुट मिळेल की नाही यावर साशंकता असून आज दुपारी आयुक्त सुनिल केंद्रेकरांसोबत व्हिसीद्वारे जिल्हाधिकारी चर्चा करत आहेत. सदरची व्हिसी संपल्यानंतर बीडच्या लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता असून सर्व परिस्थिती पाहता जिल्ह्यात काही अंशी लॉकडाऊन शिथील होण्याची शक्यता आहे.


बीड जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या आज मितीला दहा टक्क्यांच्या वर आहे. चार ते साडेचार हजार संशयितांचे स्वॅब तपासल्यानंतर पाचशेपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. त्यामुळे आजही बीड जिल्हा रेड झोनमध्ये आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल नेटवर्किंगवरून महाराष्ट्राशी संवाद साधत राज्यात काही प्रमाणात निर्बंध उठवले. ज्या जिल्ह्याची बाधितांची टक्केवारी दहा टक्क्यांच्या आत आहे अशा जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत शिथीलता देण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात बाधितांची टक्केवारी दहा टक्क्यांवर आहे.

sunil kendarekar 1

या प्रकरणी रिपोर्टरने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारी बारा वाजल्यापासून जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्यासह अन्य अधिकारी आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीमध्ये होते. सदरच्या बैठकीमध्ये कोरोनापासून खरीप हंगाम, पिक कर्ज आदी विषयांवर होत आहे. सदरची बैठक ही दुपारी तीन वाजता संपेल, अशी अपेक्षा असून या बैठकीनंतर बीडच्या लॉकडाऊनबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यातल्या बाजारपेठा, उद्योग व्यवसाय, व्यापार पुर्णत: बंद असल्याने व्यापारी वर्ग अडचणीत आहेत. अशा स्थितीत उद्यापासून व्यवहार सुरळीतपणे सुरू होतात का? याकडे सर्वांचे लक्ष असले तरी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या 1 जूनपासून जिल्ह्यात काही तासांसाठी लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!