Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाउद्यापासून कोणत्या दुकाना किती वेळ सुरू राहणार? काय आहे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश वाचा...

उद्यापासून कोणत्या दुकाना किती वेळ सुरू राहणार? काय आहे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश वाचा…


बीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून संपुर्ण लॉकडाऊनमध्ये असलेल्या बीड जिल्ह्ह्याला उद्या 1 जूनपासून काही प्रमाणात सवलत देण्यात येत असून मेडिकल, रुग्णालय, पेट्रोल पंप, टपाल सेवा सह अन्य अत्यावश्यक सेवेमधील आस्थापने उद्यापासून पुर्णवेळ सुरू राहणार आहे तर किराणा, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण, बेकरीची दुकाने सकाळी सात ते सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान उघडता येणार आहेत. मात्र शनिवार आणि रविवारी ही आस्थापने पुर्णत: बंद ठेवली जाणार असून जिल्ह्यातील दारू दुकाने पूर्णपणे बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढले आहेत. सदरचे आदेश हे 1 जून ते 15 जून या कालावधीपर्यंत आहेत.

24


    कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची टक्केवारी 16 टक्क्यांच्या घरात असल्याने जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथीलता सशर्त करण्यात आली आहे.
दिवसभर काय उघडेल
सर्व औषधालय, दवाखाने, निदान क्लिनिक, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालये, फार्मास्युटिकल कंपन्या, इतर वैद्यकी, आरोग्य सेवा ज्यात सहायक उत्पादन आणि वितरण युनिट तसेच त्यांचे डिलर्स, वाहतूक, पुरवठा साखळी – लसीचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय उपकरणे, कच्चामाल, पेट्रोल पंप, पेट्रोलियमशी संबंधित उत्पादने, टपाल सेवा सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत  उघड्या राहणार आहेत.
-दूध विक्री केवळ सकाळी सात ते 10 या वेळेतच करता येणार

23


सकाळी 7 ते 11 या वेळेत काय उघडे
-अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणार्‍या आस्थापना, किराणा दुकान, भाजीपाला, चिकन, मटन, बेकरी या सकाळी 7 ते सकाळी 11 या वेळेत चालू करता येणार आहेत. या आस्थापना शनिवार आणि रविवारी पुर्णपणे बंद राहतील.
-गॅस वितरण दिवसभर सुरू
-शासकीय कार्यालये नियमित वेळेप्रमाणे 25 टक्के उपस्थितीत सुरू राहतील. ओळखपत्र असणे बंधनकारक
– लसीकरणकरिता 45 वर्षावरील ज्या व्यक्तींना मॅसेज आला आहे अथवा आरोग्य विभागाचे पत्र आहे अशांना ओळखपत्रासह लस घेण्यासाठी बाहेर जाण्यास मुभा.
सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत काय सुरू?
– कृषी व्यवसाय संबंधी बी-बीयाणे, खते, औषधे यांची दुकाने व त्या दुकान मालकास आलेले बी-बीयाणे, खते, औषधे केवळ गोडावून किंवा दुकानामध्ये उतरून घेण्यास मुभा तसेच कृषी विक्रेत्यांना शेतकर्‍यांना बी-बीयाणे, खते, औषध विक्री व खरेदीस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत परवानगी असेल. शनिवार रविवार सुध्दा हे दुकाने यावेळेत सुरू राहतील.
– कृषी उत्पन्न बाजार समित्या सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत सुरू राहतील.
– जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत लाभार्थ्यांना धान्य वितरण करता येईल.
– जिल्ह्यातील सर्व प्रकारचे मद्य विक्री पूर्णपणे बंद राहतील.
– दुकानांना पुरवठा केल्या जाणार्‍या वस्तूच्या वाहतूकीवर निर्बंध असणार नाहीत परंतू दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. नियमाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.

Most Popular

error: Content is protected !!