बीड (रिपोर्टर) नगर रोडवर असलेल्या तहसील कार्यालयासमोर एजंटामध्ये वादावादी निर्माण झाली होती. सदरील हा वाद टेबल लावण्यावरून झाला. एकाच एजंटाने दोन ठिकाणी टेबल लावल्यामुळे दुसर्या एका एजंटाने याबाबत आक्षेप घेतला होता. हा प्रकार तहसीलदाराच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. या ठिकाणी नेहमीच एजंटांमध्ये वादावादी होत असते. यात तहसील प्रशासन कुठलीच भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे.
बीड तहसील कार्यालयासमोर दारातच काही एजंटांनी टेबल मांडलेले आहे. गेट बंद असल्यामुळे टेबल लावण्यात आले. एका एजंटाने तर आज सकाळी चक्क दोन ठिकाणी टेबल लावले. या दोन टेबलबाबत दुसर्याने आक्षेप घेतला. दोघात वादावादी निर्माण झाली होती. दोन टेबल लावणार्यांच्या विरोधात तक्रारी देण्यासाठी काही कार्यकर्ते तहसीलदार यांच्याकडे गेले होते. त्या ठिकाणी नेहमीच एजंटात वादावादी होत असते. यात तहसील प्रशासन कुठलीही ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे.