Monday, June 14, 2021
No menu items!
Homeक्राईमसराफा खून प्रकरणातील मुख्य आरोपी एलसीबीने केला गजाआड

सराफा खून प्रकरणातील मुख्य आरोपी एलसीबीने केला गजाआड

पत्नीसह झाला होता फरार; दर दोन-तीन दिवसाला रूम बदलून पोलीसांना देत होता गुंगारा
बीड (रिपोर्टर):- सोन्याच्या हव्यासापोटी शिरूर कासार येथील सराफाचा प्रिप्लॅन खून करून फरार झालेल्या मुख्य आरोपीच्या अखेर एलसीबीने मुसक्या आवळल्या. काल रात्री त्याला नाशिक रोडवर पोलीसांनी बेड्या ठोकत शिरूर पोलीसांच्या स्वाधीन केले. खून करून तो आपल्या पत्नीसह फरार झाला होता. पोलीसांना संशय येवू नये म्हणून तो दर दोन-तीन दिवसाला शहर आणि रूम बदलत असे मात्र अखेर पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

शिरूर कासार येथे २३ मे रोजी सराफा विशाल सुभाष कुलथे याचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर पोलीसांनी २ आरोपींना अटक केले होते. मात्र यातील मुख्य आरोपी ज्ञानेश्‍वर उर्फ भैय्या शिवाजी गायकवाड हा त्याच्या पत्नीला घेवून फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी शिरूर पोलीसांसह एलसीबीचे पथक रवाना झाले होते. सुरूवातीला तो औरंगाबाद येथे राहिला होता. त्यानंतर नांदेड, नाशिक सातपुर असे लोकेशन पोलीसांना मिळाले होते. तो या शहरात भाड्याने रूम करून राहत होता. मात्र पोलीसांना संशय येवू नये म्हणून दोन-तीन दिवसाला रूम चेंज करायचा आणि घर मालकाला महिन्याचं भाड देवून टाकायचा. काल नाशिक शहरातील नाशिक रोड परिसरात तो वास्तव्यास आला असल्याची माहिती स्थानिक गुन्हा शाखेचे पीआय भारत राऊत यांना झाल्यानंतर त्यांनी आपल्या टीमसह काल नाशिक शहर गाठुन नाशिक रोड पोलीसांच्या मदतीने आरोपी ज्ञानेश्‍वर गायकवाड याला बेड्या ठोकल्या. सदरील कारवाई पोलीस अधिक्षक राजारामा स्वामी, अप्पर पोलीस अधिक्षक सुनिल लांजेवार, डिवायएसपी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पीआय भारत राऊत, बालाजी दराडे, काळे, वाघमारे, हंगे, महिला पोलीस संगिता सिरसाट, जायभाय यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!