Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडकोरोना कमी होतोय, उदद्योग धंदे सुरू होतायत आनंदच! परंतु लोका हो गाफिल...

कोरोना कमी होतोय, उदद्योग धंदे सुरू होतायत आनंदच! परंतु लोका हो गाफिल राहू नका


दोन महिन्यानंतर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा ३६१ सर्वाधिक कमी आकडा
कोरोनाचा रिव्हर्स पाहून बेशिस्ती नको, शासनाच्या नियमांचे पालन कराच

बीड (रिपोर्टर):- कोरोनाने दुसर्‍या लाटेत बीड जिल्ह्यात हाहाकार उडवून दिला, अनेकांचे प्राण हिरावून घेतले. हजारो लोकांना ऑक्सिजनवर ठेवले. अशा परिस्थितीत तब्बल दोन ते अडीच महिन्यानंतर आता कोरोना हळूहळू कमी होतोय. तब्बल दोन महिन्यानंतर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा ३६१ वर आज आला आहे. ही बाब आनंदाची असली आणि उद्योग-धंदे काही प्रमाणात सुरू करण्यात आले असले तरी लोकाहो, तुम्हा-आम्हाला गाफील राहायचे नाही. तिसर्‍या लाटेला प्रोत्साहन द्यायचे नाही, कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करत सोशल डिस्टन्स, मास्क आणि नियमीत हात धुण्यास प्राधान्य द्यायचे आहे.
बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत प्रत्येक तालुका हॉटस्पॉट ठरला. कोरोनाच्या हाहाकाराने अनेकांचे घरे उद्ध्वस्त केले. कोरोनाने केलेल्या तांडवात हजारो बाधितांना कित्येक दिवस ऑक्सीजनवर मृत्युशी झुंज द्यावी लागली. गेल्या दोन ते तीन महिन्यामध्ये कोरोनाने लोकांचे जीव अक्षरश: मेटाकुटीला आणून सोडल्याचे चित्र उभ्या महाराष्ट्राने पाहिले. अशा गंभीर परिस्थितीला रोखण्यासाठी कडेकोट लॉकडाऊनची अमलबजावणी करावी लागली.
त्यामुळे उद्योग धंदे ठप्प झाले. अनेकांवर उपासमारीची वेळ आली. या परिस्थितीला तोंड देत अखेर कोरोनाला हद्दपार करण्यात जिल्हा प्रशासनासह आरोग्य प्रशासन आणि सर्वसामान्यांना आता हळूहळू यश येताना दिसून येत आहे. दोन ते अडीच महिन्यानंतर आज बीड जिल्ह्यात सर्वात कमी ३६१ कोरोना बाधीत आढळून आले. ही बाब आनंदाची आहे. आजपासून शहरातले अत्यावश्यक उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. कोरोना कमी होत आहे, उद्योग धंदे सुरू झाले आहेत. म्हणून गाफील राहू नका, कोरोनाची तिसरी लाट यापेक्षा भयंकर असेल, असे जाणकार सांगत आहेत. दुसर्‍या लाटेनेच तुमचा-आमचा जीव मेटाकुटीला आला, आता तिसरी लाट जिल्ह्यात येऊ द्यायची नाही म्हणून जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाने शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करत सोशल डिस्टन्स ठेवायचा आहे, तोंडावर मुखपट्टी लावायची आहे, सातत्याने हात धुवून लक्षणे असलेल्या प्रत्येक व्यक्तीने तात्काळ कोरोना तपासणी करून घ्यायची आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!