आष्टी (रिपोर्टर):- महाराष्ट्र राज्यातील 1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचार्यांना 1982 व 1984 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे या मागणीसाठी राज्यव्यापी पुकारलेल्या संपात आष्टी तालुक्यातील कर्मचार्यांनी सक्रिय सहभाग घेत आक्रमक झाले होते.आष्टी पंचायत समिती कार्यालयाच्या समोर व तहसिल कार्यालयाच्या समोर निदर्शने करत एकच नारा जुनी पेन्शन लागू करा सरकारने इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे.सर्व जिल्हा परिषद कर्मचारी,ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, पशुसंवर्धन विभागाचे कर्मचारी यांनी आक्रमक पवित्रा घेत पुकारलेल्या संपात सहभाग घेत पेन्शन लागू होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन
राहिल ग्रामीण रुग्णालयातील कर्मचार्यांनी केलेल्या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर याचा मोठा परिणाम झाला आहे. या संपामध्ये द्वितीय,तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीतील सर्व कर्मचारी हे सकाळी साडेसात वाजल्यापासून संपावर गेले आहेत.ग्रामीण रुग्णालयातील नर्सेस, क्ष किरण विभाग तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ,लिपिक वर्ग, सफाई कामगार, हे सर्व कर्मचारी संपावर गेल्याने सरकारी रुग्णालयात आरोग्य सेवा ढासळण्याची शक्यता आहे.पंचायत समिती कार्यालयात महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन डी एन ई 136 या संघटनेचे अध्यक्ष आबासाहेब खिलारे, जिल्हा कार्याध्यक्ष बापुसाहेब जगताप,सचिव त्रिंबक मुळीक, उपाध्यक्ष नवनाथ लोंढे,शिक्षक शिवाजी खुडे,ग्रामसेविका थोरवे,विद्या नाईक,दत्ता घोडके,बलभिम परकाळे, हरिभाऊ तांदळे, संतोष भोरे, ग्रामसेविका आदक, दिपाली गायकवाड, अनामिका शिंदे, मुख्याध्यापक सुरेश पवार, आरोग्य कर्मचारी नागेश कारंडे,गोवर्धन सायंबर,भागवत अनारसे, विकास धस,एस एस मासाळकर,विलास सोनवणे, सुनिल बोरुडे, हनुमंत गायकवाड, रामेश्वर भवर,आदी कर्मचारी आक्रमक पवित्रा घेत मोठ्या संख्येने संपामध्ये सहभागी झाले होते.तहसिल कार्यालयासमोर ही कर्मचारी यांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेत निदर्शने केली यावेळी राम खाडे यांनी पाठिंबा दर्शविला व सरकारने तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी केली.यावेळी अव्वल कारकून भगिरथ धारक,पवार,मंडळ अधिकारी पांडुरंग माढेकर,मंडळ अधिकारी तालुका अध्यक्ष शरद शिंदे,व्ही एन जाधव,शिवप्रसाद गारोळे, तलाठी चव्हाण,तलाठी आचार्य, राऊत,अश्विनी सोनवणे,तुकाराम भवर, तलाठी शरद पाटील,मंडळ अधिकारी ठाकरे,सुळ,गवळी आप्पा आदीसह मोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलन सहभागी झाले होते.