Thursday, December 3, 2020
No menu items!
Home बीड गेवराई २२ वर्षीय विवाहिता बेपत्ता

२२ वर्षीय विवाहिता बेपत्ता

बीड (रिपोर्टर)- गेवराई तालुक्यातील काळेगाव येथील एक २३ वर्षीय विवाहिता १५ नोव्हेंबर रोजी घरातून निघून गेली असून नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता ती अद्याप सापडली नसल्याने गेवराई पोलिस ठाण्यात विवाहिता बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी दाखल केली आहे. प्रियंका बालाजी चव्हाण (वय २३, रा. काळेवाडी, ता. गेवराई) ही महिला १५ नोव्हेंबर रोजी घरातून निघून गेली होती. तिचा शोध नातेवाईकांनी केला मात्र ती अद्यापही मिळून आली नसल्याने आज दुपारी गेवराई पोलिस ठाण्यात प्रियंकाच्या सासरच्या लोकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गेवराई पोलिस करत आहेत.

Most Popular

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...

माजी मंत्री पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह

बीड (रिपोर्टर)- मला सर्दी खोकला आणि ताप असल्याने मी जबाबदारी स्वीकारून स्वत:ला विलगीकरणात ठेवले आहे, अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी...

गावागावात नरभक्षी सन्नाटा अफवामुळे संभ्रम

किन्ही गावातील काही रहिवाशांचे पलायन, लहान मुलांनी स्वत:ला कोंडून घेतले; सायंकाळी पाच नंतर घराची दारे बंद करून घेतात ग्रामस्थसंपुर्ण रात्र जीव मुठीत...

पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवडे पाटील यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार

  पिंपळनेर - रिपोर्टर . बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील जेष्ठ स्वतंत्र सैनिक किसनराव नरवाडे पाटील यांचे...