Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeक्राईममजुराच्या अपहरण प्रकरणी एकास अटक मजुराचा अद्याप पत्ता लागला नाही

मजुराच्या अपहरण प्रकरणी एकास अटक मजुराचा अद्याप पत्ता लागला नाही


बीड (रिपोर्टर):- ऊसतोड मजुराचे दोघा जणांनी अपहरण केले असल्याची तक्रार मजुराच्या पत्नीने सिरसाळा पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर या प्रकरणी पोलीसांनी एका जणास ताब्यात घेतले. मात्र मजुराचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. आपल्या पतीला पोलीसांनी शोधावे अशी मागणी पत्नीने केली आहे.
धनराज तिडके (वय 30) रा.खाडेवाडी ता.माजलगाव या मजुराचे पैशासाठी गेल्या काहीदिवसापूर्वी अपहरण करण्यात आले. सदरील हे अपहरण दिनकर जिजाबा खाडे रा.रूई आणि लक्ष्मण बब्रुवान मुंडे रा.कोठरबन ता.वडवरी या दोघांनी केल्याची तक्रार धनराज तिडके यांची पत्नी आयोध्या तिडके यांनी सिरसाळा पोलीस
ठाण्यामध्ये दाखल केली होती. पोलीसांनी लक्ष्मण मुंडे यास ताब्यात घेतले. मात्र मजुराचा अद्यापही पत्ता लागला नसून आपल्या पतीचा तात्काळ शोध घ्यावा अशी मागणी मजुराच्या पत्नीने केली आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!