माजलगाव (रिपोर्टर) राज्यातील दि.1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचार्यांना 1982 व 1984 ची जूनी पेंशन योजना पूर्ववत लागू करण्यात यावी या मागणीसाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीने तहसील समोर तीव्र मंगळवार दि.14 मार्च रोजी निदर्शने केली.
राज्यातील दि.1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त सर्व कर्मचार्यांना 1982 व 1984 ची जूनी पेंशन योजना पूर्ववत लागू करणे या मागणीसाठी आज दि . 14 मार्च 2023 पासून बेमुदत संपावर जात असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.त्या अनुषंगाने राज्य सरकारी,निमसरकारी,शिक्षक शिक्षकेत्तर,कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या तहसिल माजलगांव या ठिकाणी निदर्शने करण्यात आली.सदरील मागणीची तिव्रता लक्षात घेवून लवकरात लवकर जूनी पेंशन योजना लागू केल्याची घोषणा करावी.अन्यथा सदरील संप व आंदोलन अधिक तिव्र केले जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दरम्यानच्या निदर्शनाद्वारे सरकारला दिला आहे. या निदर्शनात संजय खेत्री,माणिक राठोड,रूपचंद आभारे,आशिष रासवे, सदाशिव भालेराव, परमेश्वर चाफाकानडे, विजय गंगने, पुरुषोत्तम जाधव, मनीषा पवार, पंडित मेंडके, नारायण झोडगे,पीबी शिंदे यासह अनेक कर्मचार्यांचा सहभाग होता.