Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeबीडनिराधारांच्या प्रस्तावासाठी तहसील कार्यालयात झाली बैठक

निराधारांच्या प्रस्तावासाठी तहसील कार्यालयात झाली बैठक


दोन्ही अध्यक्षांसह तहसीलदारांची उपस्थिती

बीड (रिपोर्टर):- बीड शहरासह तालुक्यातील निराधारांचे प्रश्‍न तात्काळ मार्गी लावले जात नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून प्रस्तावासंदर्भात बैठक आयोजीत करण्यात आली नव्हती. आज बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावाबाबत चर्चा झाली असून या बैठकीला दोन्ही अध्यक्षांसह तहसीलदार, नायब तहसीलदार व समितीचे सदस्य उपस्थित होते. बीड शहरासह तालुक्यातील साडेआठ हजार प्रस्ताव तहसील कार्यालयामध्ये पडून आहेत. प्रस्तावा संदर्भात निराधारांनी अनेक वेळा कार्यालयात चकरा मारल्या मात्र त्यांच्या प्रस्तावावर कुठलीही कारवाई झाली नव्हती. आज तहसीलदारांनी निराधारांच्या प्रस्तावासंदर्भात बैठक आयोजीत केली होती. या बैठकीला शहराचे कमिटीचे अध्यक्ष अशफाक इनामदार, ग्रामीणचे भाऊसाहेब डावकर, तहसीलदार वमने, नायब तहसीलदार, सदस्य गोविंद साठे, विद्या चौरे, राजेश गवळी, अमर ढोणे, भीमराव चामरे, मेहराज खान, शिवगण मुकुंदराज, सुनिल महाकुंडे, पंकज कुटे, कुटे मॅडम, सोनाली तांदळे यांची उपस्थिती होती.

Most Popular

error: Content is protected !!