Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनामृत्यू प्रमाणपत्रावर ‘कोरोना’चा उल्लेख करा जिल्हाधिकार्‍यांचे जिल्हा रुग्णालयाला आदेश

मृत्यू प्रमाणपत्रावर ‘कोरोना’चा उल्लेख करा जिल्हाधिकार्‍यांचे जिल्हा रुग्णालयाला आदेश


बीड (रिपोर्टर):- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मृत्यू झालेले आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृत्यू प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाकडून नातेवाईकांना देण्यात येते मात्र त्यावर या रुग्णाचा कशाने मृत्यू झाला याचा उल्लेख नसतो. या मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक शासकीय-निमशासकीय कर्मचार्‍यांचाही समावेश आहे. काही मृतांमध्ये विविध कंपन्यांच्या विमा पॉलिसी काढलेल्या आहेत. त्यामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना विविध योजनांचा फायदा मिळण्यासाठी कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र मागण्यात येते. ते न मिळत असल्यामुळे अनेक लोकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली. याची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी आज कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतांच्या प्रमाणपत्रावर ‘कोरोना’चा स्पष्ट उल्लेख करावा, असे आदेश जिल्हा रुग्णालयाला दिलेले आहेत.
जिल्हा रुग्णालयाकडून जे मृत्यू प्रमाणपत्र देण्यात येते त्यावर कशामुळे मृत्यू झाला? याचा उल्लेख करण्यात येत नाही. एखाद्या मृत व्यक्तीच्या नातेवाईकाने मृत्यूचे कारण विचारले असता त्याबाबत संबंधिताचा अर्ज घेऊन वेगळे प्रमाणपत्र दिले जाते. मात्र त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या अडचणी सुटत नसल्याने जिल्हाधिकार्‍यांनी याची गंभीर दखल घेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृत्यू प्रमाणपत्र देताना कोरोनाचा स्पष्ट उल्लेख करावा, असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाला आपल्या मृत्यू प्रमाणपत्राच्या रकाण्यामध्ये आता कोरोनाचा उल्लेख करावा लागेल.

Most Popular

error: Content is protected !!