Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडअपहृत मुलीच्या शोधासाठी लाच मागणारा दिंद्रुडचा पीआय निलंबीत

अपहृत मुलीच्या शोधासाठी लाच मागणारा दिंद्रुडचा पीआय निलंबीत

एसपी राजारामा स्वामी यांचा दणका
बीड (रिपोर्टर):- १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार घेऊन गेलेल्या बापाला मुलीच्या शोधासाठी लाच मागणार्‍या दिंद्रुडच्या पीआयला अखेर निलंबीत करण्यात आले आहे. या प्रकरणी पीडिताच्या वडिलाने पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन मुलीच्या तपासासाठी लाच मागत असलेल्या पीआयची ऑडिओ क्लिप दिली होती.


दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे गेल्या एक महिन्यापुर्वी अपहरण झाले होते. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीचे अपहरण झाले असल्याची रितसर तक्रार नोंदवली होती. त्यानंतर मुलीच्या तपासासाठी दिंद्रुड पोलीस ठाण्याचे प्रमुख पीआय अनिल गव्हाणकर यांनी एजंट मार्फत ४० हजारांची मागणी केली होती. मुलीच्या बापाने एजंटला १५ हजार रुपये दिले होते मात्र पुर्ण ४० हजार रुपये आल्यावरच मुलीचा तपास करू असे ठाण्यातून मुलीच्या बापाला सांगण्यात आल्यानंतर त्यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून या संदर्भात एसपींकडे रितसर तक्रार दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी याबाबत चौकशी करून यात दोषी असलेल्या ठाणेप्रमुख गव्हाणकर यांना निलंबीत केले. तब्बल एक महिन्यानंतर मुलीचा शोध लागला असून पोलिसांनी त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केले आहे.

Most Popular

error: Content is protected !!