Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमजागते रहो! गावातील चोर्‍या रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दल

जागते रहो! गावातील चोर्‍या रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दल

जागते रहो! गावातील चोर्‍या
रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दल
कुक्कडगाव (रिपोर्टर)- गेल्या काही दिवसांपासून कुक्कडगावमध्ये भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. चोर्‍या रोखण्यासाठी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन ग्रामसुरक्षा दल स्थापन केले. ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य दररोज गावात जागरण करून गावाची रक्षा करणार आहे.
दोन दिवसांपूर्वी कुक्कडगाव येथून विद्युत मोटारी चोरीला गेल्या होत्या. त्यानंतर एका वस्तीतून दोन गायी चोरीला गेल्या. वाढत्या चोरीच्या घटना पाहता याला प्रतिबंध घालण्यासाठी गावकर्‍यांनी गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आज ग्रामसभा आयोजीत करण्यात आली होती. त्या ग्रामसभेत सर्वानुमते सुरक्षा दल स्थापन करण्यात आले. याबाबतचे निवेदन पिंपळनेर पोलिसांनाही देण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!