Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडमराठ्यांनो, कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नका न्याय हक्काच्या लढाईसाठी उद्याच्या मोर्चात सहभागी...

मराठ्यांनो, कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नका न्याय हक्काच्या लढाईसाठी उद्याच्या मोर्चात सहभागी व्हा -आ.मेटे


जिल्हाभरातील बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद, आजची मोटारसायकल रॅलीही दणक्यात
बीड (रिपोर्टर):- मराठा आरक्षणासाठी ५ जून रोजी शिवसंग्रामचे सर्वेसर्वा आ. विनायक मेटे यांच्या नेतृत्वात बीडमध्ये पहिला मोर्चा निघणार असून या मोर्चाची सर्व तयारी पुर्णत्वाकडे गेली आहे. कुठल्याही परिस्थितीत मोर्चा निघणारच या निर्धारावर असलेले विनायक मेटे यांनी कुठल्याही अफवांना मराठा समाजाने बळी न पडता निर्भयपणे ५ तारखेच्या मोर्चात जिल्ह्यातील मराठा समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. तत्पुर्वी आज मराठा समाजाच्या वतीने बीड शहरातून मराठा तरुणांनी मोटारसायकलवर रॅली काढली.
न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्दबातल केल्यानंतर राज्यभरातील मराठा समाजात संताप असून राज्यातील ठाकरे सरकारने न्यायालयामध्ये मराठा समाजाची बाजु भक्कमपणे मांडली नाही त्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. या भूमिकेत राज्यातला अखंड मराठा समाज असून मराठ्यांना आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह समाजाच्या अन्य मागण्यांसाठी बीडमधून ५ जून रोजी शिवसंग्रामचे सर्वेसर्वा आ. विनायक मेटे यांनी मोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चाच्या विरोधात काही लोक अफवा पसरवत असून जिल्ह्यातील मराठा समाजाने अशा लोकांच्या अफवांवर सोशल मीडियावरील खोट्या पोस्टवर, माध्यमामधील बातम्यांवर विश्‍वास न ठेवता आपल्या न्याय-हक्काच्या लढयासाठी मोर्चात सामील व्हावे, असे आवाहन आ. मेटेंनी आज केले. रिपोर्टरशी बोलताना मेटे म्हणाले की गावागावात मोर्चाच्या निमित्ताने आयोजीत बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मराठा समाज आरक्षण रद्द झाल्यामुळे संतापलेला आहे. ७० टक्के मराठा समाज आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे. त्यामुळे आरक्षण हे समाजाच्या हक्काचे आहे. समाजाचा हा आवाज थेट सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी मोर्चाचे आयोजन असून काही विघ्नसंतोषी लोक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र जिल्ह्यातील मराठा समाज अशा लोकांकडे दुर्लक्ष करत मोर्चामध्ये सामील होण्याचे आश्‍वासन प्रत्येक बैठकांमध्ये देत आहेत. काहीही झालं तरी ५ तारखेचा मोर्चा हा होणारच हा निर्धार करत आ. मेटेंनी जिल्ह्यातील मराठा समाजाला या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले. तत्पुर्वी आज सकाळी शिवसंग्रामच्या कार्यालयापासून तरुणांनी शहरातून एक भव्य मोटारसायकल रॅली काढली. भगव्या पताका लावलेल्या मोटारसायकली शहरभरातून फिरून आल्या. या रॅलीलाही तरुणांचा मोठा सहभाग लाभला.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!