Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडआ.मेटे भाजपाचे हस्तक, दिल्लीश्वरांच्या आदेशावरून गावागावात मराठे पेटवत आहेत, बीडमधील मराठा आरक्षण...

आ.मेटे भाजपाचे हस्तक, दिल्लीश्वरांच्या आदेशावरून गावागावात मराठे पेटवत आहेत, बीडमधील मराठा आरक्षण मोर्चा हा भाजपाचा अधिकृत मोर्चाकॉंग्रेसची आरक्षणविरोधी भूमिका कधीच नव्हती -डॉ. लाखे पाटील
बीड (रिपोर्टर):- आरक्षणासारख्या महत्वाच्या प्रश्‍नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे सर्वच नेते मराठा समाजाला उचकवत असून विनायक मेटे हे भाजपाचे हस्तक आहेत, न्याय दरबारी आरक्षण गेल्यानंतर ज्या गडबडीने देवेंद्र फडणवीसांनी आदेश काढला ती गडबड त्यांनी केली नसती तर आज ही वेळ आली नसती. आज ठाकरे सरकारवर आरोप केला जातोय, ठिक आहे आम्हाला अक्कल नव्हती, तुम्हाला होती तर तुम्ही स्वतंत्र याचिका दाखल का केली नाही? असा सवाल करत महाराष्ट्रातील भाजपा दिल्लीश्वरांची सुपारी घेऊन हे सगळं करत असून गावागावात जावून मराठे पेटवायचे काम सुरू आहे. दिल्लीत जावून मराठा समाजाला न्याय द्या, गावात सभा घेऊन काय होणार? असा टोला मारत विनायक मेटे हे मराठ्यांसाठी नाही तर स्वत:साठ आणि भाजपासाठी लढत असल्याचा घणाघाती आरोप कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी केला. मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी कॉंग्रेसचे प्रवक्ते लाखे पाटील हे बीड येथे आले होते. या वेळी त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आरक्षणाच्या विरोधात कॉंग्रेसची कधीच भूमिका नव्हती. आरक्षणाच्य समर्थनार्थ कॉंग्रेस पक्ष पुर्वीपासून आहे. मात्र भाजपा आणि विनायक मेटे यांच्याकडून मराठा समाजाची जाणीवपुर्वक दिशाभूल केली जातेय. भाजपाचे सर्वच नेते तसेच देवेंद्र फडणवीस, मेटे हे समाजाला उचकावत आहेत, त्यांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. विधी आणि न्यायमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची फसवणुक केली. एसईबीसी कायदा टिकत नव्हता तरी कायदा केला. राज्याला अधिकार ठेवले नसताना त्यांनी हा कायदा केला. देवेंद्र फडणवीस यांचे आरोप म्हणजे लहान मुलांसारखे आरोप असल्याची टीकाही या वेळी त्यांनी केली. या राज्याला उच्च विरोधी पक्षनेत्याची परंपरा आहे. दिल्लीश्वराची सुपारी घेऊन हे सगळं सुरू असून गावागावात जावून मराठे पेटवण्याचे काम भाजपाच्या वतीने केले जात आहे. छत्रपती संभाजी राजे, राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत. कुठल्याही पक्षाचे नाहीत. आमचे श्रध्दास्थान आहेत. चार वेळा वेळ मागूनही त्यांना देशाचे पंतप्रधान वेळ देत नसतील तर ही आश्‍चर्याची बाब नव्हे का ? दिल्लीत जावून मराठा समाजाला न्याय द्यावा, गावागावात सभा घेऊन काय होणार? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. या बैठकीला कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी, ऍड. कृष्णा पंडित, महादेव धांडेसह कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Most Popular

error: Content is protected !!