Saturday, December 5, 2020
No menu items!
Home बीड अंबाजोगाई बनावट नोटा चलनात आणल्या अंबाजोगाईत गुन्हा दाखल

बनावट नोटा चलनात आणल्या अंबाजोगाईत गुन्हा दाखल


अंबाजोगाई (रिपोर्टर)अंबाजोगाई शहरा लगत असलेल्या चनाई येथे राहणार्‍या चौधरी व पांचाळ नामक दोन युवकांवर दोनशे व पन्नास रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये आज रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे
याबाबत नुसार सूत्रांकडून समजलेल्या माहिती नुसार अधिक माहिती अशी की अंबाजोगाई शहरा लगत असलेल्या चनाई येथील दोन युवक व त्यांचे ईतर अन्य साथीदार बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशन चे प्रभारी पोलीस निरीक्षक दहिफळे यांना त्यांच्या माहितीदाराने दिली होती त्यानुसार दहिफळे यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना मुद्देमाल सोबत गजाआड करण्याचा निर्णय घेतला काल संध्याकाळी हे दोघेजण सुविफ्ट डिजायर गाडी घेऊन अंबाजोगाई शहरात बनावट नोटा चालवत असल्याचे समजताच पोलीस निरीक्षक दहिफळे यांनी आपल्या साथीदार समावेत त्यांच्यावर झडप टाकली असता चौधरी यास गाडी सहित पकडण्यास ते यशस्वी झाले तर पांचाळ हा फरार झाला चौधरी याची पोलीस स्टेशनमध्ये आणून चौकशी केली असता त्याच्या जवळून दोनशेच्या व पन्नास रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या यातील दुसरा आरोपी पांचाळ याने आज पर्यंत अनेक बोगस लक्की ड्रॉ मार्केटिंगच्या बोगस कम्पण्याच्या माध्यमातून भल्या भल्याना टोपी दिल्याचे आता समोर येत आहे पांचाळ व चौधरी च्या सम्पर्क मध्ये शहरातील अनेक जण असल्याचे समजले असून हे बनावट नोटा स्वतः तयार करत होते की दुसर्‍या शहरातून येथे आणत होते तसेच यांच्या सोबत आणखी कितीजण सहभागी आहे याचा तपास पो नि दहिफळे करत आहे

Most Popular

मोठी बातमी – मराठवाडा पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी

औरंगाबाद : ऑनलाईन रिपोर्टर  मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग...

एकाच क्रमांाकाचे दोन ऍपे रिक्षे पोलीसांची चौकशी सुरू

बीड (रिपोर्टर)ः- शिवाजी नगर पोलीसांनी काही प्रवासी वाहतूक करणारे ऍपे रिक्षे ताब्यात घेतले आहे. यात दोन ऍपे रिक्षाचा नंबर एक सारखाच असल्याने...

सुप्रिया सुळेंना राज्याच्या नाही, केंद्राच्या राजकारणात रस -पवार

पुणे (रिपोर्टर)- भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय...

बिबट्या बीडच्या सीमेवर, चर्‍हाट्याजवळ महिलेवर हल्ला

बीड (रिपोर्टर)- आष्टी तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक बिबट्या पकडण्यात अद्याप वनविभागाला यश आले नसतानाच बीडच्या सीमेलगत चर्‍हाट्याजवळ एका महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची...