Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडउद्धव ठाकरे इकडं लक्ष द्या, संकटातही मराठा तरूण रस्त्यावर उतरलाय!, आरक्षण द्या...

उद्धव ठाकरे इकडं लक्ष द्या, संकटातही मराठा तरूण रस्त्यावर उतरलाय!, आरक्षण द्या नाही तर तुमचे पुढचे दिवस चांगले नाहीत -आ.विनायक मेटे


बीड (रिपोर्टर):- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ईकडे लक्ष द्या, एवढ्या संकटातही बीडमध्ये मराठा तरूण रस्त्यावर उतरला आहे. ही नुसती सुरूवात आहे. तुम्ही लक्ष दिले नाही तर तुमचे दिवस चांगले नाहीत असा इशारा देत शिवसंग्रामचे आ.विनायक मेटेंनी इथे उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. हा कोणाच्या अंगावर विनाकारण जात नाही. परंतू कोणी अंगावर आल्या शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. तेंव्हा आमच्या भविष्याशी कोणी खेळत असेल तर आम्ही त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं म्हणत आ.विनायक मेटेंनी आज आक्रमक भूमिका घेतली.


बीड येथे आयोजित मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला संबोधित करतांना आ.विनायक मेटे म्हणाले की, मी सर्व प्रथम बीड जिल्हा प्रशासनाचे आभार मानतो. हा मोर्चा होवू नये म्हणून शासनस्तरावर बीडच्या प्रशासनावर प्रचंड दबाव होता. मात्र अशा स्थितीतही प्रशासनाने आम्हाला मदत केली. प्रशासनाने याचीही नोंद घेतली पाहिजे.हा इथे उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. हा विनाकारण कोणाच्या अंगावर जात नाही. परंतू कोणी अंगावर आलाच तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही. हा मोर्चा रास्त मागणीसाठी आहे. म्हणूनच या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम, धनगर, मागास समाज पुढे आला. त्यांनी मराठा समाजाच्या या आरक्षण मोर्चाला पाठिंबा दिला. आता तरी राज्यातल्या सरकारने ईकडे लक्ष दिले पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ईकडे लक्ष द्या, एवढे संकट असतांना मराठा तरूण रस्त्यावर उतरला.ही नुसती सुरूवात आहे. तुम्ही लक्ष दिले नाही तर तुमचे दिवस पुढचे चांगले राहणार नाहीत. ही लढाई गरीब मराठ्यांनी उभारली आहे. सत्त्याची आहे, तुम्ही श्रीमंतांच्या नादी लागू नका, या लढाईत गडावरचे, गढीवरचे, वाड्यावरचे अथवा वाडीचे मराठे नाहीत तर हे पिचलेले आर्थिकदृष्ट्या मागास असलेले मराठे आहेत. गेल्या तीस-चाळीस वर्षापासून मराठे आरक्षणासाठी लढत आहेत. मला आठवतय १९८२ साली मुंबईमध्ये स्व.आण्णासाहेब पाटलांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी मोर्चा काढला होता. त्या मोर्चात मी ही उपस्थित होतो. तेंव्हापासून आजपावेत मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर आहे. अनेकांनी आरक्षणासाठी बलीदान दिले. कै.आण्णासाहेब पाटलांची आत्महत्या नसून ती कॉंग्रेसने केलेली हत्याच असल्याचा घणाघाती आरोप मेटेंनी केला. सरकारच्या मुर्खपणामुळे मराठ्यांचं आरक्षण गेलं. एक महिना झालं तरी सरकारने याचिका दाखल केली नाही. या सरकारच्या पेकाटातत लाथ घातल्याशिवाय जाग येणार नाही असं म्हणत आ.मेटेंनी आरक्षण मोेर्चाचा एल्गार पुकारला आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच असणार असल्याचे त्यांनी म्हटले.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!