Monday, June 14, 2021
No menu items!
Homeबीडनरेंद्र पाटील कडाडले! अशोक चव्हाणांवर टिकास्त्र सोडले

नरेंद्र पाटील कडाडले! अशोक चव्हाणांवर टिकास्त्र सोडले


मराठा आरक्षणासाठी आमच्या बापाने रक्त सांडलंय, बांधवांनी बलिदान दिलंय मग आम्ही गप्प कसे बसणार, शांत कसे बसणार, आमच्या अंगात छत्रपतीचं रक्त आहे. न्याय हक्कासाठी आम्ही लढणारच, अरे ज्याच्या बापाने आणि ज्याच्या पक्षाने मराठ्यांना कधी न्याय दिला नाही त्याला मराठा आरक्षण समितीचा अध्यक्ष केलं असा नाव न घेता अशोक चव्हाणांवर घनाघाती हल्ला करत नरेंद्र पाटलांनी मोर्चाला संबोधीत केले. एक मराठा लाख मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की जय! अशा गगनभेदी घोषणा देत नरेंद्र पाटील आक्रमकपणे राज्य सरकारवर कडाडले. ज्याच्या बापाने आणि पक्षाने मराठ्यांना कधी न्याय दिला नाही त्याला मराठा आणक्षण समितीचे अध्यक्ष केले मग तो काय मराठ्यांना न्याय देणार? कॉंग्रेसने मराठ्यांना कधीच न्याय दिला नाही. मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी कधीही प्रयत्न केला नाही. इतिहास साक्षीला आहे आमच्या बापाचं रक्त सांडलं. अनेक मराठा बांधवांनी बलिदान दिलं. आम्ही स्वस्थ बसणार नाही, शांत बसणार नाही, जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आक्रमकपणे लढा देणारच!

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!