Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईमबाळांतीन पाच दिवसाच्या बाळासह पुरात अडकली, माऊली गदडे देवासारखे धावून आले पुरात...

बाळांतीन पाच दिवसाच्या बाळासह पुरात अडकली, माऊली गदडे देवासारखे धावून आले पुरात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढले


बीड (रिपोर्टर)ः- परळी तालुक्यामध्ये काल मुसळधार पाऊस पडला. या पावसाने नदया नाल्यांना पाणी आले. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बोधेगांव येथील वडयाला पाणी आले होते. या पाण्यातूनच जिप चालकांने जिप घातली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने गाडी पाण्यात अडकली. यामुळे आतील बाळंत महिलेसह ईतर प्रवासी प्रचंड घाबरले. चालकाने आरडा ओरड केल्यानंतर याच परिसरातील माऊली गदडे व्यक्ती धावून आले. त्यांनी आपल्या जिवाची परवा न करता बाळ, बाळंतीनीसह इतर प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या धाडसी कार्याबद्दल माऊली गदडे याचं सर्वत्र कौतुक होत आहे.


अंबाजोगाईच्या रुग्णालयातून बाळांतीन माता आणि पाच दिवसाच्या बाळाला घेवून बोधेगांव मार्गे बोलेरो गाडीने आपल्या कासारी बोडखा या आपल्या गावी जातांना पावसाने बोधेगांव येथे झोडपले. पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाने गाडी पाण्यात घातली. पाणी जास्त असल्याने पाणी आतमध्ये अडकून पडली. रात्री कोणीही मतद करायला तयार नव्हते. ड्रायव्हरने सिरसाळा पोलीस, बोधेगांव येथील सामाजिक कार्यकर्ते माऊली गदडे यांना फोन करुन त्या कुटूबीयांना वाचवण्याचे आवाहन केले. माऊली गदडे यांनी स्वतःह पहिल्यांदा जावून घटना स्थळी आरडा ओरड करुन गावकर्‍यांना बोलावून घेतले. आणि गावकर्‍यांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.दरम्यान मी अगोदर सुरूवातील सोल घेवून पाण्यात उडी मारली. नंतर माणसं वाचवण्यासाठी प्रयत्न करु लागलो. सुरूवातील पाच दिवसाच्या लहान मुलाला बाहेर काढले. पुन्हा हळू हळू सुखरूप बाहेर काढले. कासारी बोडखा येथील बडे कुटूबांतील ही माणसं होती. त्यांना पाहटे दोन वाजता पाणी कमी झाल्यानंतर गाडी काढून देवून सुखरूप घरी पाठवले असे माऊली गदडे यांनी सांगितले. माऊली गदडे यांनी पाऊस चालू असतांना जिवाची परवा न करता मदतीला धावून गेले. या त्यांच्या कार्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!