बीड(रिपोर्टर): तीन दिवसांपासून मराठवाड्यात कोठे ना कोठे पावसासह गारपीट होत आहे. या पावसाचा जबरदस्त फटका रब्बी पिकांसह फळपिकांना बसू लागला आहे. दुपारी नवगण राजुरी सर्कलमधील पिंपरगव्हाण, खापरपांगरी, हिवरसिंगा, काकडहिरा आदी परिसरात धुवाधार गारपीट झाली. या गारपीटीने परिसरातील गहू, हरभरा यासह फळपिकांचे नुकसान झाले आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. तीन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यभरात कोठे ना कोठे अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा खरिप पिकासह फळबागांना मोठा फटका बसला. आज दुपारी राजुरी सर्कलमधील खापरपांगरी, हिवसिंगा, काकडहिरा सह आदी परिसरात प्रचंड प्रमाणात गारपीट झाली. या गारपीटीमुळे परिसरातील गहू पुर्णत: खराब झाला. त्याचबरोबर फळपिकाचे नुकसान झाले आहे. ज्यांची ज्वारी काढण्यात आली होती. त्या ज्वारीचेसुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे. अंबा, शेवगा, मोसंबी, लिंबू, भाजीपाला इत्यादी पिकांना गारपीटीमुळे तडाखा बसला आहे.