Tuesday, September 21, 2021
No menu items!
Homeकोरोनाआनंदी आनंदगडे..! आज पॉझिटिव्हचा आकडा १८१

आनंदी आनंदगडे..! आज पॉझिटिव्हचा आकडा १८१


बीड (रिपोर्टर):- चांगला परिणाम दिसून आला. गेल्या आठ दिवसापासून जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी कमी होत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. उद्यापासून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यातच आज आलेला पॉझिटिव्हचा आकडा अत्यंत कमी आल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. आज आलेल्या अहवालात १८१ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
दुसरी लाट खतरनाक ठरली, अनेकांना आपला जीव गमवावा लागला. दुसर्‍या लाटेची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या वतीने कडक निर्बंध लावण्यात आलेले होते. जिल्हा प्रशासनानेही बीड जिल्ह्यामध्ये कडक नियम लावलेले होते. त्यामुळे रूग्णांची संख्या कमी होण्यास मदत झाली. गेल्या आठ दिवसापासून कोरोना पॉझिटिव्हचा आकडा कमी होवू लागल्याने जिल्हावासियात समाधान व्यक्त केले जावू लागले. उद्यापासून बीड जिल्ह्यामध्ये सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सर्व व्यवहार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यातच आज आलेला पॉझिटिव्ह आकडाही समाधान देणारा आहे. १८१ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. ३ हजार ५७४ जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले. ३७५५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ११, आष्टी ३८, बीड ३०, धारूर १०, गेवराई १६, केज २९, माजलगाव १२, परळी १, पाटोदा ८, शिरूर १० आणि वडवणीमध्ये १६ रूग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!