Wednesday, September 22, 2021
No menu items!
Homeबीड‘त्या’ चोरट्यांकडून आठ तोळे सोने घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

‘त्या’ चोरट्यांकडून आठ तोळे सोने घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


बीड (रिपोर्टर)- आवरगाव, भोगलवाडी, सोनीमोहा, लाडेगाव व बोरीसावरगाव येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालत घरफोड्या करून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणातील एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यानंतर त्याच्याकडून काल ८ तोळे सोने जप्त केले. सदरील कारवाई स्थानीक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संतोष जोंधळे आणि त्यांच्या टिमने केली.
केज, धारूर तालुक्यात गेल्या काही दिवसात चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. तेथे घरे फोडून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. आवरगाव येथील बालासाहेब नखाते या शेतकर्‍याचे घरही चोरट्यांनी फोडले होते. त्यानंतर या घरफोडीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने लावल्यानंतर एका आरोपीला ताब्यात घेतले होते. त्याच आरोपीने आवरगाव, भोगलवाडी, सोनीमाहा, लाडेगाव व बोरीसावरगावमध्ये चोरी केली असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर त्याच्याकडून काल आठ तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले.

Most Popular

error: Content is protected !!